सुधीर मुनगंटीवार यांनी राम मंदिर आंदोलनातील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. १९९० मध्ये लग्नात मंदिर यही बनाएंगे फलक लावला होता, तर ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडताना ते स्वतः कारसेवेत सहभागी होते असे सांगितले. त्यांना पद मिळण्याची चिंता कधीच नसते, तर सनातन धर्माचे काम महत्त्वाचे वाटते, असेही त्यांनी नमूद केले.