प्रभाग क्रमांक सहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रचार रॅली झाली. यावेळी बोलताना आपण निवडून येऊ या आशेवर बसू नका. घरोघरी जाऊन वंचित बहुजन आघाडीची विचारधारा लोकांपर्यंत नेऊन पोहोचवा आणि मतदान वंचितकडे खेचून आणा, असे सुजात आंबेडकर म्हणाले.