राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी संभाजी भिडे यांच्या शरद पवारांवरील वक्तव्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे. सहा दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पवारांबद्दल अशी टिप्पणी करणे अयोग्य असून, भिडे यांची विचारसरणी कुठे हरवली आहे, असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.