महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून रायगडच्या म्हसळा शहरात नगरपंचायत मार्फत 1 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून शिवस्मारक आणि शिवसृष्टी उभी राहतेय. खासदार सुनील तटकरे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी स्वराज्याच्या भूमीत पुन्हा एकदा शिवप्रेमींसह नागरिकांना या शिवस्मारकातून वेगळी प्रेरणा घेता येणार असल्याच त्यांनी म्हटल आहे.