नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यवसाय आणि लग्नसमारंभांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. गॅस कंपन्यांकडून पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि केटरिंग व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय चालतो.