अकोला शहरात पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर समस्या समोर आली आहे... शहरातील अनेक भागांमध्ये नळातून गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत... या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला असून पोटाचे विकार आणि इतर आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे...दरम्यान, नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय... प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.