जळगावच्या धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करत निदर्शने करत दिल्लीतील अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. केंद्रीय व राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आणि काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.