सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील राजकीय संवादात बदल झाल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या की, सध्या भाषणे कमी होऊन मुलाखती वाढल्या आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, राज्यासमोर दोन भावांच्या राजकारणापेक्षाही मोठी आणि व्यापक आव्हाने आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.