महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार प्रचाराची तयारी सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे नेते अडीच वर्षांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घड्याळाचा प्रचार करणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्यानंतर ही रणनीती आखण्यात आली आहे.