गुहागर किनारपट्टीवरील सुरूच्या झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळल्याने सुरू बन विरळ झाले आहेत. काही भागांतील पूर्वीची दाट झाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुरूच्या झाडांमुळे किनारपट्टीसह गुहागर शहराचे वादळी वाऱ्यांपासून संरक्षण होते. मात्र आता झाडांची संख्या कमी झाल्याने भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता आहे.