यवतमाळ शहरात गीता परिवाराच्या वतीने शक्ती भक्ती संस्कार कुंभ या कार्यक्रमाचे आयोजन आज नेहरू स्टेडियम येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील दहा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सूर्यनमस्कार, मल्लखांब अशा विविध मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसोबतच भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले.