आज महापरिनिर्वाण दिन आहे. सूर्यभान आचार्य यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी आकाशवाणी वरून ऐकल्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथून बाबासाहेबाना अखेरचं पहायला काही तरुण सापडेल त्या वाहनाने निघाले. गर्दीतून वाट काढीत हे तरुण दादरला पोहचले खरे मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याच्याच काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.