राज्य शासनाच्या एफआयआरनुसार तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर सरकारी जमिनींचा अपहार करून खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा आरोप आहे. 2001 साली कथितपणे कर्णबधिर गटातून नोकरीत रुजू झाल्याने, त्यांचा 2001 MPSC घोटाळ्याशी संबंध जोडला जात आहे. विजय कुंभार यांनी त्यांच्या कर्णबधिरत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे.