आजच्या कॅबिनेट बैठकीला शिंदे गटाचे बहुतांश मंत्री गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगत, भाजपा कोणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. शिंदे गटातील नेत्यांना येणाऱ्या चौकशीचा धोकाही त्यांनी अधोरेखित केला.