स्वरूपानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त दिंडी पालखी, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. दिंडी पालखीमध्ये अनेक गावातील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. जय जय स्वरूपानंदच्या गजराने इंझाळानगरी दुमदुमली. महोत्सवात नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.