थंडीतील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे रताळे. हे फक्त चविष्टच नाही, तर ऊर्जा देणारे सुपरफूड आहे. यात फायबर, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेला चमक येते. रक्तातील साखर संतुलित ठेवून पोट भरलेले ठेवते. स्मार्ट स्नॅकिंगसाठी रताळ्याचा आहारात समावेश करा.