अमरावती शहरात पार पडलेल्या एका भव्य आणि अनोख्या विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर येथील जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या मानस कन्येचा विवाह अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.