मंत्री तानाजी सावंत यांनी युतीसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. जनतेची नाराजी व्यक्त करत, युतीचा निर्णय माझे पक्षप्रमुख घेतील असे ते म्हणाले. केवळ एका पक्षासोबतच नाही, तर चर्चेसाठी सर्व पक्षांसाठी आमची दारे खुली आहेत, असे सांगत त्यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली.