मंत्री तानाजी सावंत यांनी एका बंडखोर उमेदवाराला कडक शब्दात खडसावले आहे. गुत्तेदारीतील गैरव्यवहार, निकृष्ट रस्ते आणि विकासकामे थांबविल्याचे आरोप करत सावंत यांनी चौकशी लावण्याचा इशारा दिला. सामान्य लोकांचे शोषण सहन करणार नाही, असे बजावत सावंत यांनी स्वतःला विकासाचा पुरस्कर्ता आणि सामान्य जनतेचा पाठीराखा म्हणून संबोधले.