नंदुरबारमध्ये खान्देशातील दमदार पावसामुळे तापी नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. नंदुरबारच्या सारंगखेडा बॅरेजचे दहा तर प्रकाशा बॅरेजचे तेरा दरवाजे उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजमधून 1 लाख 32 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकाशा बॅरेजमधून 1 लाख 90 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.