बारामती तालुक्यातील तरडोली येथे नवनाथ भोसले या युवकाचा भरधाव गाडीने धडक दिल्याने 9 जानेवारी रोजी जागीच मृत्यू झाला होता. याआधीही तसेच तरडोली गाव आणि परिसरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तरडोली गावातील ग्रामस्थांनी आज पुणे बारामती या मार्गावर रास्ता रोको केला.