भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत 125 विद्यार्थी शिकत असून, केवळ 3 शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अपुरे राहिले असल्याने पालकांत नाराजी व्यक्त होत आहे.