जालन्यातील बदनापूर तालुक्यातल्या डापका तांडा येथील शाळेच्या वर्गाची खोली कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 8 महिन्यांपासून उन्हात बसून शिकावं लागत आहे. वर्गाच्या खोलीची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार निवेदन देण्यात आलंय. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.