लातूर येथेही शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा रद्द करा अशा अनेक मागण्या सरकारकडे केल्या आहेत.