एकीकडे अंगाची लाहीलाही करणारे उन्हाळ्याचे चटके आणि दुसरीकडे समोर डोळ्यांसमोर वाहणारे गोदावरी नदीचे अथांग पाणी... अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गंगापूर तालुक्यातील कानडगाव शिवारात दोन शिक्षकांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून चक्क लाकडी तराफ्यावरून नदी ओलांडली.