अमरावतीमध्ये टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यात 12 संघटनांचे हजारो शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले. शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अमरावती शाखेकडून निवेदन जारी करण्यात आले होते.शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचं शिक्षक संघटनांकडून आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई करण्याचं पत्र काढण्यात आलं आहे. हे पत्र चर्चा न करता काढण्यात आलं, आंदोलन लोकशाही मार्गाने आहे, ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असं शिक्षक नेत्या डॉ.संगीता शिंदे यांनी म्हटलं आहे.