येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात तेल्या रोगाने डाळिंब बागांना अक्षरशः वेढा घातला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोंडाजी शिंदे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या तीन एकर बागेत तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याने संपूर्ण बाग ट्रॅक्टरच्या साहाय्याने नष्ट करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.