गोंदिया जिल्ह्यात तापमानाची वरखाल नियमितपणे सुरू असून मंगळवारी पारा घसरून 8.4 अंशावर आला होता. त्यामुळे थंडीचा जोर परत एकदा वाढला असून जिल्हावासीयांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे नागरिकांना आता दिवसभर गरम कपडे घालूनच राहावे लागत आहे. अनेक नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पहायला मिळाले.