जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागच्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा अधिकच वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वांगाची लाही.. लाही होत आहे. कृषी विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा तडाखा अधिकच वाढला असून जालना शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सूर्य मोठ्या प्रमाणात आग ओकत असून मे महिन्यात यापेक्षाही कठीण जाणार का असा सवाल निर्माण झाला आहे,त्यामुळे सद्यस्थितीत शहरातील नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी घरीच राहणे पसंत केल आहे.