अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल 42 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. या वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरही जाणवू लागला आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असतानाही अपेक्षित अशी भाविकांची गर्दी दिसून येत नाहीये.