वर्ध्यात सुर्य आग ओकत असताना पेट्रोल पंपावर फॉगर फॅन लावून गारवा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पेट्रोल पंपावर देखील मोठे पंखे लावण्यात आले आहेत. पाण्याचा फवारा उडल्याने पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांसोबत ग्राहकांना उन्हापासून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या कडक उन्हात पेट्रोल, डिझेल भरायला येणाऱ्या ग्राहकांना थोडा का होईना दिलासा मिळण्यास मदत मिळत आहे. वर्ध्यात पारा ४६ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. फॉगर फॅनच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.