वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने असून या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला असून आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. एरव्ही उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक रसवंतीगृहांचा आधार घेतात, मात्र सध्या उष्णतेची झळ इतकी तीव्र आहे की नागरिक बाहेर पडणंही टाळतआहेत.