श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित आठ पुजाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस संस्थानकडून बजावण्यात आलीय. या पुजाऱ्यांवर तीन महिन्यांसाठी मंदिरप्रवेश बंदीची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.