नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी येथे पूर परिस्थिती निर्माण झाली. गोदावरी नदी पात्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. पाणी पात्राबाहेर आल्याने खंडेराव महाराज मंदिर छतापर्यंत पाण्यात बुडाले. तर नदीपात्रात असलेले हेमाडपंथी मंदिराचे कळस दिसेनासे झाले.