कल्याण गांधारी परिसरातील फर्निचर शोरूममध्ये मध्यरात्री अजगर शिरला. 10 ते 12 फुटी महाकाय अजगर कामगारांच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यावेळी कामगार गाढ झोपेत होते नागरिकांच्या आरडाओरडामुळे कामगार जागे झाले. ‘W.A.R फाउंडेशन’च्या सर्पमित्रांनी तातडीने धाव घेत अजगर पकडला आणि वनविभाग, अग्निशमन दलाकडे तो अजगर सुपूर्द केला.