शिरूर तालुक्यात वन्यजीवांचा वाढता वावर, त्यातून बिबट्यांच्या हालचाली… आणि आता मोकाट कुत्र्यांची दहशत शिरूर तालुक्यात वाढत चालली आहे . गेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान चिमुरड्यांना आपला जीव वाचवणंही कठीण होत चाललं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे.