पावसाने दडी मारल्याने धुळे जिल्ह्यात खरीप पिकांची परिस्थिती गंभीर बनली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.