स्मार्ट मिटर वाढीव बील संदर्भात मार्ग ताम्हाणे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मोर्चा काढला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरसकट स्मार्ट मीटर लावल्यामुळे वाढीव बिल मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं त्यांनी म्हटलं.