ठाणे येथे संजय गांधी उद्यानातील गेटजवळ आज रात्री १२.४० मिनिटांनी श्वानावर हल्ला केल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी वन विभागाचे पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली. मात्र, बिबटा काही आढळून आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने परिसरात गस्त वाढवली असून ट्रॅप कॅमेरेही बसविले आहेत.