महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग अतिप्राचीन व जागृत देवतस्थान सुमारे एक हजार वर्ष जुन्या ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असणारे ग्रामदैवत श्री. कोपिनेश्वर मंदिरात पहाटे 2 वाजल्यापासून महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. कोपिनेश्वरच्या दर्शनासाठी मंदिराला वेळखा घालून तब्बल दोन ते तीन किलोमीटर लांब रांग पसरली आहे. स्त्रियांकरिता वेगळी रांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता वेगळी रांग व VIP व्यक्तींकरिता यंदा मंदिर प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे.