ठाण्यातील कोपरी परिसरात सोनू ऑटो गॅरेज, जुना कोपरी कपडा मार्केट या ठिकाणी आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अधिकारी दाखल झाले आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर आग आटोक्यात आली असून कुलिंगचं काम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.