ठाण्यातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या प्रचार दौऱ्यात मोठा अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी विकासकामांच्या अभावामुळे त्यांचा रस्ता अडवून जाब विचारला. "बदल हवा" असे फलक घेऊन नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात तात्पुरती कामे करून नंतर पाठ फिरवल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यामुळे बारटक्के यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत.