शहापूर तालुक्यातील अघई परिसरातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील भवरपाडा ते वांद्रे एक असा किमी अंतर असलेल्या जागी रस्ता नसल्याने येथील आदिवासी बांधवांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय. काल भवरपाडा येथील एका आदिवासी महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला झोळीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.