रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून चढण्याची वेळ आली. याच गर्दीतून एका प्रवाशाचा तोल जाऊन तो थेट रुळावर पडल्याची धक्कादायक घटना घडली. ही दृश्ये एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहेत.