ठाण्यातील येऊर येथे वन विभागाने दहा घरांवर सुरू केलेली कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी आदिवासी बांधवांनी शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. आदिवासींच्या मागणीची दखल घेत कारवाई तात्काळ थांबवण्यात आली, ज्यामुळे आंदोलनाला यश आले.