लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरुका भागात जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. तिरु नदीच्या डोंगराळ भागात या बिबट्याची शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. पाळीव जनावरे आणि कुत्र्यांचा या बिबट्याने फडशा पाडला होता. त्यामुळे शेतकरी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत होते. आज अखेर हा बिबट्या वन विभागाने जेरबंद केला आहे.