पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे 208 वा शौर्य दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने लाखो अनुयायांनी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शौर्यभूमी कोरेगाव भीमा येथे गर्दी केली.अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने तयारी केली असून परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला. विजय स्तंभाला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाईने या विजय स्तंभ आणि परिसर उजळून निघाला आहे.