शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. गेली महिनाभरात वन विभागाने पिंपरखेड परिसरातून हा 25 वा बिबट्या जेरबंद केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाण बिबटे जेरबंद करूनही अद्याप या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या बिबट्यांना जेरबंद करण्याचे मोठ आव्हान वनविभागापुढे आहे.