बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या २८७ व्या जन्मोत्सव सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. आज सकाळी मुख्य पालखीची भव्य प्रभातफेरी गावातून काढण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले असून रंगीबेरंगी रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला आहे.