गडहिंग्लज तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हलकर्णी-बसर्गे ओढ्यावरील पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने दोन्ही गावांतील संपर्क तुटला आहे. ओढ्यावर नवीन पुलाचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला बायपास आणि भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेला.